Women Dance Viral Video Instagram
देश विदेश

Dance Video : ‘भाभी तू पटोला’ गाण्यावर महिलेने केला भन्नाट डान्स; सपना चौधरीलाही टाकलं मागे!

लग्न असो वा पार्टी गाणं वाजलं की आपोआप हातपाय थिरकायला लागतात. डान्स करण्यामध्ये आता महिलाही काही मागे राहिलेल्या नाही.

Satish Daud

Women Dance Viral Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. डान्स (Dance Video) करण्याची मजा काही वेगळीच असते. लग्न असो वा पार्टी गाणं वाजलं की आपोआप हातपाय थिरकायला लागतात. डान्स करण्यामध्ये आता महिलाही काही मागे राहिलेल्या नाही.

पुरूषांबरोबर महिला मंडळीचे देखील डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक सुंदर महिला पंजाबी डान्सर सपना चौधरीसारखा डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video)  ही महिला हरिणायातील हिट सॉन्ग ‘भाभी तू पटोला, कतई बम का गोला से’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. अगदी काही सेकंदाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. व्हिडीओत महिलेने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली असून ती चांगलेच ठुमके लगावताना दिसून येत आहे.

डान्स करताना या महिलेने चेहऱ्यावर दिलेले एक्सप्रेशन्स जबरदस्त आहेत. हिरव्या रंगाच्या साडीसोबत या महिलेने कानात सोनेरी रंगाचे मोठे झुमके घातले आहेत. त्याचबरोबर हातात हिरव्या, निळ्या रंगाच्या बांगड्या देखील घातल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे, गाण्याचे बोल बदलत असताना या महिलेच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ @haryanvi_dance_reels नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT