Snake Viral Video Saam Tv
देश विदेश

Snake Attack : चिमुकल्याचा धक्का लागताच नागाने काढला फणा; पुढे काय झालं? पाहा VIDEO

सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Snake Viral Video : साप असं नावही जर ऐकलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. साप आणि माणसांत नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. तसं पाहता साप मानवाचं कोणतंही नुकसान करत नाही. मात्र, तरी देखील माणसाने साप बघितला तर तो लगेच त्याला मारण्याठी काठी शोधतो. एखाद्या व्यक्तीकडून जोपर्यंत सापाला ईजा होत नाही, तोपर्यंत तो चावत नाही. याचाच प्रत्यय एका व्हिडिओतून (Viral Video) आला आहे. सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Snake Attack Viral Video)

या व्हिडिओत एका लहान मुलाचा नकळत एका विषारी सापाला धक्का लागतो. धोका लक्षात येताच साप लगेच फणा काढतो. मात्र या मुलाची आई हे बघते आणि काही सेकंदातच ती मुलाला उचलून बाजूला करते. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. एका युट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ (Social Media) शेअर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक घर दिसत आहे. घराच्या बाजूला एक रस्ता आहे. घरातून खाली उतरण्यासाठी दोन पायऱ्या देखील आहे. व्हिडिओमध्ये एक विषारी साप पायऱ्यांच्या खालच्या बाजूने जाताना दिसत आहे. त्याचवेळी घरातून एक लहान मुलगा आणि त्याची आई येते. त्यांचं या सापाकडे लक्ष नसतं. अचानक मुलगा हा पायरी उतरण्यासाठी खाली पाऊल टाकतो. (Cobra Snake Viral Video)

नकळतच त्याच्याकडून या सापाला धक्का लागतो. धक्का लागताच साप जोरदार फणा काढतो. त्याचवेळी मुलाची आई या सापाला बघते. साप पलटवार करणार इतक्यात ती मुलाला उचलून बाजूला पळते. सापालाही धोका टळला असे वाटते, मग तोही आपल्या मार्गाने निघून जातो. ही संपूर्ण घटना घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT