woman killed husband with help of boyfriend in rajasthan  Saam Tv
देश विदेश

काकावर विवाहितेचं जडलं प्रेम; अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढला

पत्नीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचत प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

दौसा : पत्नीने (Wife) आपल्या पतीच्या हत्येचा कट रचत प्रियकराच्या साथीने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या दौसा येथे ही घटना घडली आहे. दौसाच्या चांदसेन गावात महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (Crime) नोंद केला आहे. आरोपी महिला आणि प्रियकराला अटक केली आहे. (rajasthan crime News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाआधी ओम प्रकाश गुर्जर आणि रेशंता यांचा विवाह झाला होता. तरीही रेशंताचे दुसऱ्या गावात राहणाऱ्या धर्मवीरसोबत अनैतिक संबंध होते. धर्मवीर हा रेशंताचा नात्याने दूरचा काका लागत होता. नात्याने काका असूनही दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे दोघांनी पती ओम प्रकाश गुर्जरच्या हत्येचा कट रचला. रेशंताने झोपेच्या गोळ्या मागविल्या. त्यानंतर तिनं पतीच्या रात्रीच्या जेवणात १० गोळ्या टाकल्या. त्यानंतर रेशंताच्या पतीला गाढ झोप लागली. पती झोपी जाताच तिनं प्रियकराला बोलावून घेतले.

पत्नी रेशंतानं प्रियकराला बोलावून त्याचा हातात कुऱ्हाड सोपावली. त्या कुऱ्हाडीने रेशंताच्या पतीची हत्या केली. आरोपी धर्मवीरने त्यांच्या लग्नाच्या पहिला वाढदिवसालाच कुऱ्हाडीनं दोन वेळा हल्ला करत रेशंताच्या पतीची हत्या केली. त्यानंतर दोघेही दुचाकीनं फरार झाले. सकाळी नातेवाईक ओम प्रकाश गुर्जरला उठवायला आले, त्यापर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ओमच्या मृत्यूनं परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी हजर झाले. सदर हत्येप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला. अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी महिला आणि आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या.

Edited By - Vishal Gangurdrde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT