A woman jailer ties the knot with a former prisoner in Satna, Madhya Pradesh, in a unique interfaith wedding that has gone viral. saam tv
देश विदेश

प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा! महिला जेलरने कैद्याशी केलं लग्न; बजरंग दलाने केलं कन्यादान

Woman Jailer Marries Former Prisoner In Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सतना येथे महिला जेलरने तुरुंगातील कैद्याशी प्रेम करून लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. धर्माच्या सीमा ओलांडून झालेल्या या विवाहात बजरंग दलाने कन्यादान केल्यामुळे ही प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Omkar Sonawane

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, याचा प्रत्यय देणारी एक अनोखी घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिला जेलरने चक्क तुरुंगातील कैद्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह केला आहे. समाज आणि धर्माच्या भिंती ओलांडून झालेला हा विवाह सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सतना येथील मध्यवर्ती कारागृहात फिरोजा खातून या जेलर म्हणून कार्यरत होत्या. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह नावाचा तरुण एका प्रकरणात शिक्षा भोगत होता. ड्यूटीदरम्यान फिरोजा आणि धर्मेंद्र यांची ओळख झाली. सुरुवातील झालेली ही ओळख मैत्रीत बदलली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झाले. धर्मेंद्र सिंह याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. फिरोजा खातून या मुस्लिम समुदायातील आहेत, तर धर्मेंद्र सिंह हा हिंदू आहे. या विवाहासाठी फिरोजा यांच्या कुटुंबियांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र आपल्या प्रेमावर ठाम राहून फिरोजा यांनी धर्माच्या सीमा ओलांडून धर्मेंद्रसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

बजरंग दलाने केलं कन्यादान

या विवाहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, फिरोजा यांनी हिंदू रितीरिवाजानुसार धर्मेंद्रशी लग्न केले. यावेळी फिरोजा यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. अशा वेळी हिंदू संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत फिरोजा यांच्या कन्यादानाची जबाबदारी पार पाडली. पूर्ण धार्मिक विधींनुसार हा विवाह सोहळा पार पडला. सध्या या दांपत्याचे फोटो आणि ही अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, 'प्रेमाला कोणतेही बंधन नसते' अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

SCROLL FOR NEXT