Cobra Snake Video Saam Tv
देश विदेश

Snake Video : महिला गाढ झोपेत, अंगावर फणा काढून बसला कोब्रा; पुढे काय झालं?, पाहा VIDEO

गाढ झोपेत असलेल्या या महिलेच्या अंगावर अचानक एक कोब्रा चढतो.

साम टिव्ही ब्युरो

Snake Viral Video : सापं असं जरी नावही ऐकलं तर भल्याभल्यांना घाम फुटतो. अचानक साप दिसला, तर काही वेळ काळजाचा ठोका देखील चुकतो. सोशल मीडियावर (Social Media) सापाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण विचार करा जर कुणी गाढ झोपेत असेल आणि एखादा भलामोठा कोब्रा साप त्याच्या अंगावर आला तर काय होईल? असाच एक उरात धडकी भरवणारा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Snake Attack Viral Video)

व्हिडीओत एक महिला पलंगावर झोपलेली दिसत आहे. गाढ झोपेत असलेल्या या महिलेच्या अंगावर अचानक एक कोब्रा चढतो. या कोब्राने महिलेच्या अंगावर चढून फणा देखील काढला. आपल्या अंगावर कोब्रा चढल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. आता आपलं काही खरं नाही असं या महिलेला वाटलं असावं. (Cobra Snake Viral Video)

मात्र तरीही या महिलेनं धीर सोडला नाही. कुठलीही हालचाल न करता गप्प एकाजागी पडून आहे. आपण जराही हालचाल केली तर हा कोब्रा आपल्याला चावेल हे महिलेला कळून चुकलं होतं. त्यामुळेच या महिलेनं जराही हालचाल केली नाही. आपल्यावर आलेलं हे संकट टळावं म्हणून ती देवाचे नामस्मरण करताना दिसत आहे. (Cobra Snake Women Viral Video)

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कर्नाटकातील आहे. इथे एक महिला एका झाडाखाली टाकलेल्या पलंगावर निवांत पडली होती. ती गाढ झोपेत असताना तिथे एक भलामोठा कोब्रा साप आला. हा कोब्रा झोपलेल्या महिलेच्या अंगावरही चढला. महिलेला आपल्या अंगावर कोब्रा चढला असल्याचं कळालं. तिने कुठलीही हालचाल न करता देवाचे नामस्मरण सुरू केलं.

महिलेची कोणतीही हालचाल होत नसल्याचं पाहून साप काही मिनिटांनंतर कोणतीही इजा न करता तिथून निघून गेला. त्यानंतर या महिलेच्या जीवात जीव आला. या प्रसंगी एक छोटीशी चूक सुद्धा महिलेच्या जीवावर बेतू शकली असतील. पण सुदैवाने असं काहीच घडलं नाही. दरम्यान, अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संकटाचा अगदी संयमाने सामना करणाऱ्या या महिलेचं नेटकरी कौतुक करताहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

SCROLL FOR NEXT