निष्काळजीपणाचा बळी! महिलेच्या गळ्यात अडकले कोरोना टेस्ट किट Saam Tv
देश विदेश

निष्काळजीपणाचा बळी! महिलेच्या गळ्यात अडकले कोरोना टेस्ट किट

देशभरात कोरोनाच्या महामारीने लाखो लोकांचा जीव धोक्यात गेला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाच्या CoronaVirus महामारीने लाखो लोकांचा जीव धोक्यात गेला आहे. आजून देखील कोरोनाची महासाथीची टांगती तलवार असून, तिसऱ्या लाटेत परत एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोना महासाथी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना तपासणी दरम्यान निष्काळजीपणा बघायला मिळाला आहे.

यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना किटमधील दांडी महिलेच्या गळ्यात अडकली. यानंतर अर्धा तास महिला तडफडत राहिली आणि यातच तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिहार मधील पाटना या भागात घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम बहाद्दूर दार यांची ६५ वर्षीय पत्नी जासो देवी या कोरोनाची टेस्ट करण्याकरिता गेले होते.

हे देखील पहा-

त्यावेळेस तोंडात तपासणीकरिता किट घालण्यात आले होते .तेव्हा ते गळ्यामध्येच अडकले, अशी माहिती मृत महिलेचे पती राम बहाद्दूर दास यांनी सांगितली आहे. त्यांनी हा आरोप देखील केला आहे. की वैद्यकीय व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मात्र, अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळला आहे.

जासो देवी या कोरोनाची चाचणी करण्याकरिता आले होते. यावेळी त्यांच्या तोंडात कोरोना चाचणी किट घालण्यात आली होती. मात्र, ते तोंडातच अडकले. यामुळे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. यातच त्या बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, डॉ. कमलेश कुमार यांनी टेस्ट दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा नकार दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT