प्रेम प्रकरणात आला जमिनीचा वाद; प्रेयसीनं प्रियकराला संपवल आणि मृतदेह...  Saam Tv
देश विदेश

प्रेम प्रकरणात आला जमिनीचा वाद; प्रेयसीनं प्रियकराला संपवल आणि मृतदेह...

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. धक्कादायक विषय म्हणजे प्रेयसीनेच (girlfriend) ही हत्या केली आणि प्रियकराचा (boyfriend) मृतदेह तिच्या पलंगाखाली गाडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटना उघडकीस येताच आसपासच्या लोकांना धक्का बसला आहे.

संपूर्ण प्रकार बघून पोलिस (Police) देखील चक्रावून गेले आहेत. जमिनीचा वाद टोकाला गेल्यानंतर प्रेयसीने प्रियकराची चाकू भोसकून हत्या केली आहे. त्यानंतर तिने त्याचा मृतदेह स्वत:च्या बेडरूममध्ये (bedroom) पलंगाखाली दफन करून ठेवला आहे. पूर्णिया (Purnia) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे संपत पासवान एका आठवड्या (Weeks) अगोदर बेपत्ता झाले होते.

हे देखील पहा-

जमिनीचे व्यवहार करणाऱ्या संपत यांचे अपहरण झाले असावे अशी शंका कुटुंबियांनी (family) होती. आता त्यांचा मृतदेह प्रेयसीच्या बेडरुममध्ये सापडला आहे. सरना चौक परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या आशा देवी यांच्या घराची जमीन खोदून पासवान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अवैध संबंध आणि जमिनीच्या वादामधून संपत पासवान यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी आशा देवीने संपत यांची हत्या करून त्यांचा मृतदेह स्वत:च्या घरात पलंगाखाली गाडून टाकला होता. संपत पासवान बेपत्ता असल्याची तक्रार आठवड्या अगोदवेर त्यांच्या कुटुंबियांनी नोंदवली होती. पोलिसांनी संपत यांचा सीडीआर (CDR) चेक केला. त्यानंतर आशा देवीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिला पोलिस खाक्या दाखवल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे.

जमिनीच्या वादामधून आशा देवीने तिच्याच घरात संपत यांची चाकूने हत्या केली आहे. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने संपत यांचा मृतदेह पलंगाखाली (bed) दफन करून टाकला आहे. हत्या करण्याअगोदर संपत पासवान, आशा देवी आणि तिचे साथीदार घरात दारू प्यायले. पोलिसांना घरात दारूच्या बाटल्या देखील सापडले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT