Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : भरबाजारात वाईनशॉप मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; नालासोपाऱ्यात लपून बसलेला आरोपी पोलिसांच्या अटकेत

मध्यप्रदेश पोलिसांची एक टीम कांदिवली पोलिसांच्या मदतीने गेल्या तीन दिवसांपासून यादवचा शोध घेत होती.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Madhya Pradesh : काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये एका वाईनशॉपच्या मॅनेजरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच त्याच्या जवळ असलेले २५लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. या आरोपींपैकी आता एकाला नालासोपारामधून अटक करण्यात आली आहे. (Wineshop Manager)

सदर हत्याकांडामध्ये ५ व्यक्तींचा समावेशा आहे. दरम्यान निलेश यादव (वय ३०) या आरोपीला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. सदर घटनेनंतर आरोपी लपण्यासाठी नालासोपारा येथे आला होता.

आरोपी निलेश यादव हा मुंबईमधील कांदिवली परिसरात लपून बसला आहे, अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्या माहितीनुसार मध्यप्रदेश पोलिसांची एक टीम कांदिवली पोलिसांच्या मदतीने गेल्या तीन दिवसांपासून यादवचा शोध घेत होती.

गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी निलेश यादव हा नालासोपारामध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी नालासोपारा (Nalasopara ) पेलहार पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानंतर अवघ्या चार तासात सापळा रचून आरोपी निलेश यादव याला अटक करून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नालासोपारा पेलहार ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT