Surgical Strike  Saam TV
देश विदेश

Surgical Strike: पीओकेमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? घुसखोरीवर केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता

Surgical Strike In Pok: पीओकेमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? घुसखोरीवर केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता

Satish Kengar

Surgical Strike In Pok:

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीवर केंद्र सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी भारताने सुरु केली आहे.

पाकिस्तानने घुसखोरीची वृत्ती थांबवली नाही तर, भारत सरकारसमोर कारवाईचे सर्व पर्याय खुले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सीमेत घुसखोरी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. कारण ही सर्व क्षेत्रे त्यांच्याद्वारे चालविली जातात आणि नियंत्रित केली जातात. सूत्रांनी सांगितलं की, अतिप्रशिक्षित दहशतवादी, जे घात लावून हल्ले करण्यात निपुण आहेत, त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या सपोर्ट फायरने भारतीय सीमेत पाठवलं जातं.  (Latest Marathi News)

सरकारमधील सूत्रांनी CNN-News18 ला दिलेल्या माहितीनुसार, सैन्याकडे तात्काळ प्रभावाने युद्धविराम संपवण्याचा पर्याय आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूपच खराब परिस्तिथीत आहे. यातच नियंत्रण रेषेच्या (LOC) देखभालीसाठी त्यांच्या सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. जो त्यांना आता भारी पडत आहे.

सूत्रांनी सांगितले की, आमच्याकडे दुसरा पर्याय आहे की, हे घुसखोर जिथे बसले आहेत तिथे त्यांच्या लाँचिंग कॅम्पवर हल्ला करणे. तसेच आपल्या सीमा वाचवण्यासाठी त्यांच्या भागात घुसखोरी करणे. त्याचप्रमाणे तिसरा मार्ग म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) प्रदेशात राहणारे लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. अशातच 1971 भारताने जे केलं ते पुन्हा केलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

SCROLL FOR NEXT