Can Rahul Gandhi Contest Election Again: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भातील मानहानी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींचा २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्गही कठीण झाला आहे.
त्यांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्याने राहुल गांधी २०२४ ची लोकसभा लढाऊ शकतील का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. मोदी आडनावावर भाष्य केल्याबद्दल मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर, त्यानंतर ते २०२४ ची निवडणूक लढवू शकतील. (Latest Marathi News)
गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याचिकेवर म्हटलं आहे की, ते अस्तित्वात नसलेल्या कारणांवरून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचा नियम नाही. हा फक्त एक अपवाद आहे, ज्याचा अवलंब दुर्मिळ प्रकरणांमध्ये केला पाहिजे.
गुजरात उच्च न्यायालयाने वीर सावरकरांच्या नातवाने दाखल केलेल्या खटल्याचाही संदर्भ दिला आणि म्हटले की, याचिकाकर्त्यावर सुमारे १० गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावतीने गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यावर सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर रोख लावण्यासाठी कोणतेही योग्य कारण देण्यात आलेले नाही. (Political News)
सर्वोच्च न्यायालयात दाखल करू शकतात याचिका
राहुल गांधी आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. मोदी आडनाव मानहानी प्रकरणात राहुल यांना दोषी ठरवणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास त्यांचे संसद सदस्यत्वही बहाल होऊ शकते. यासोबतच राहुल यांचा २०२४ मध्ये निवडणूक लढवण्याचा मार्गही खुला होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.