Chhattisgarh News Saam tv
देश विदेश

Chhattisgarh News: पतीने पाय दाबून दिले नाहीत म्हणून पत्नीने संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Bilaspur News: दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच पुन्हा एकदा छत्तीसगडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे क्षुल्लक कारणांवरुन महिलेने आत्महत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल सहज लहान लहान कारणांवरुन नवरा- बायकोमध्ये वाद होत असतात. अगदी क्षुल्लक कारणांवरुन पती-पत्नी पोलीस ठाण्यात पोहचल्याच्या अनेक प्रकार समोर येत आहेत. अनेकदा यांच्यातील वाद टोकाला जातात हे समजतं नाही.

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे नवऱ्याने पाय दाबून दिले नाही,म्हणून नाराज असलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या या घटनेने संपूर्ण संबंधित परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड(chhattisgarh)मधील बिलासपूर येथे ही धक्कादायक घटना घडली असून सूशीला साहू असे आत्महत्या केलेल्या महिलेच नाव आहे. सूशीला आणि तिचा पती भूपेद्र यांचा सहा- वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. लग्न केल्यानंतर दोघंही देवरीडीह येथील तोरवा भागात वास्तव्यास आहेत.

काय घडले ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता.२० जून गुरुवारी रोजी सुशीलाची तब्येत जरा ठीक नव्हती. त्यामुळे सुशीलाने आपल्या पतीस भुपेंद्र याला पाय दाबण्यास सांगितले मात्र भुपेंद्र घरातील इतर कामात व्यस्त होता त्यानंतर सुशीला आपल्या खोलीत गेली. भुपेंद्रचे काम झाल्यानंतर तो आपल्या मुलासोबत दुसऱ्या खोलीत झोपून केला.

मात्र भुपेंद्रने पाय न दाबल्याने सुशीला त्याच्यावर नाराज होती. काही कारणांमुळे भुपेंद्रला जाग येते त्यानंतर तो सुशीलाच्या खोलीत जातो. मात्र खोलीत जाताच सुशीला फासावर लटकलेली दिसली. घाबरलेल्या भुपेंद्रने तिला खाली उतरवून तात्काळ जवळील रुग्णालयात(hospital) नेले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने या प्रकरणाचा अधित तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT