Who will be Chief Minister in Rajasthan? Saam Tv
देश विदेश

Rajasthan New CM: राजस्थानमध्ये कोणाला मिळणार मोदींची गॅरंटी, वसुंधरा राजे की ओम माथूर? जाणून घ्या कोण होणार मुख्यमंत्री

राजस्थानमध्ये कोणाला मिळणार मोदींची गॅरंटी, वसुंधरा राजे की ओम माथूर? जाणून घ्या कोण होणार मुख्यमंत्री

Satish Kengar

Who will be Chief Minister in Rajasthan:

राजस्थानमध्ये भाजपने अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केलेलं नाही. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी कोणाला मिळणार आणि वसुंधरा राजे परतणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, ओम माथूर, किरोरी लाल मीना, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सहाहून अधिक नेत्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महंत बालकनाथ आणि किरोरी लाल मीना यांनी स्वतः आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं घोषित केलं आहे. अशातच पक्षाला जर वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवायचे असते, त्या त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली असती. मात्र निवडणुका केवळ पंतप्रधान मोदींच्या चाऱ्यावर लढवण्यात आली. अशातच वसुंधरा राजे यांचीही मुख्यमंत्री बनण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.  (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजस्थानचे मुख्यमंत्री निवडले जातील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशातच दलित व्यक्ती किंवा ओबीसी चेहऱ्याला भाजप संधी देऊ शकते. यातच केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे.

किरोडी लाल आणि शेखावत शर्यतीतून बाहेर?

राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, किरोडी लाल यांच्यावर एका जाती विशेषमधून येत असल्याचा शिक्का आहे. अशा परिस्थितीत त्यांची शक्यताही कमी दिसते. किरोडीलाल यांची दिल्लीतील पकड कमकुवत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळेच त्यांना 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत संघटना आणि सरकारमध्ये मोठे पद मिळालेले नाही. तर त्यांचे कनिष्ठ सतीश पुनिया, गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन मेघवाल यांना मोठी पदे मिळाली आहेत. यातच भाजप गजेंद्र सिंह शेखावत यांनाही मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT