1 नोव्हेंबर 2021 पासून या स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद! Saam Tv
देश विदेश

1 नोव्हेंबर 2021 पासून या स्मार्टफोन्समधील WhatsApp होणार बंद!

नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुने स्मार्टफोन्स वापरणाऱ्याकरिता एक महत्वाची बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला जुने स्मार्टफोन्स वापरणाऱ्याकरिता एक महत्वाची बातमी आहे. उद्यापासून काही जुन्या स्मार्ट फोन्समध्ये WhatsApp ची सुविधा बंद होणार आहे. तसेच अॅपलच्या iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असलेल्या फोनमध्ये WhatsApp सपोर्ट करणार नाही. आपल्याकडे जर Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 हे मोबाईल फोन आहेत, तर या फोन मधील WhatsApp वापरण्यास अडचण येऊ शकते किंवा ही सुविधा उद्यापासून बंद होऊ शकणार आहे.

हे देखील पहा-

एका महत्वाच्या अहवालात असे सागंण्यात आले आहे की Android 4.0.3 आणि त्याच्या अगोदरच्या म्हणजे जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनचा WhatsApp चा सपोर्ट काढून घेण्यात आला आहे. जर आपल्याकडे या व्हर्जनचा स्मार्टफोन असेल आणि आपल्याला त्यातमध्ये WhatsApp वापरायचे असेल, तर तो स्मार्टफोन अपग्रेड करावा लागणार आहे. त्याच बरोबर आपण जर अॅपलचा iOS 9 वापरत असाल किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनचा आयफोन किंवा मोबाइल वापरत असाल, तर त्याला देखील अपडेट करावे लागणार आहे. जर आपला आयफोन अपडेट होत नसेल, तर WhatsApp वापरता येणार नाही.

Google Nexus S, HTC Deisre S आणि Sony Ericsson Xperia Arc हे स्मार्टफोन्स एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. त्यात अपडेटची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे या मोबाइल मधील WhatsApp उद्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात WhatsApp अनेक नवे फिचर्स उपलब्ध करुन देणार आहे, तसेच मल्टी डिव्हाइसची सोय देखील उपलब्ध करुन देणार आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT