West Bengal Chief Minister Mamata Banerjee during a government meeting as the state announces transfer of several IAS officers. Saam Tv
देश विदेश

राज्यात मोठे प्रशासकीय बदल; १२ IAS अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली, पाहा कोणाला कुठे पोस्टिंग?

IAS Officers Transfer List 2026: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी सरकारने 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करत अनेक जिल्ह्यांना नवीन जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये प्रशासकीय बदल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारने एकाचवेळेस 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. अलिपुरद्वार, बांकुरा, उत्तर दिनाजपुरसह अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. एडीएम आणि एडीसीओ पदांचे प्रभार देखील बदलण्यात आले आहे. या संबधित शुक्रवारी आदेश प्रारित करण्यात आले आहे.

IAS अधिकारी यांची कोलकत्ता जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोलकत्ता महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. बांकुरा येथील खत्रा येथे एसडीओ म्हणून नियुक्त शुभम मौर्य यांची बोनगाव उत्तर 24 परगाणा येथे एसडीओ म्हणून बदली करण्यात आली आहे. कोलकत्ता महानगरपालिकेचे आयुक्त सुमित गुप्ता यांना कोलकत्ता येथे डीएसडीएलआरएस पश्चिम बंगाल जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली

निखिल शर्मा यांची नादियाचे नवीन जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुसंपदा विकास विभागाचे विशेष सचिव शेवाळे अभिजित तुकाराम यांना अलीपुरद्वारचे नवीन जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बांकुरा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सियाद एन यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांना उत्तर २४ परगण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कारभार सोपवण्यात आला आहे.

बांकुरा येथील नवीन जिल्हाधिकारी अनिश दास गुप्ता असतील, जे नादिया जिल्हा दंडाधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळत होते.

उत्तर दिनाजपूरचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीणा यांची कोलकाता महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या IAS अधिकाऱ्यांना मिळाली नवीन जबाबदारी

कूचबिहारमध्ये एडीएम म्हणून काम करणारे शंतनू बाला यांना मुर्शिदाबादचे नवे एडीएम बनवण्यात आले आहे.

श्रीनिवास व्यंकट राव पाटील यांना बांकुरा येथील एडीएम करण्यात आले आहे, त्यापूर्वी ते पश्चिम मेदिनीपूर एडीएम पदाची जबाबदारी सांभाळत होते.

रघुनाथपूर पुरुलियाचे एसडीओ म्हणून कार्यरत असलेले विवेक पंकज यांची मत्स्यव्यवसाय, जलसंवर्धन, जलसंपदा आणि मत्स्यव्यवसाय बंदर विकास विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खरगपूर पश्चिम मेदिनीपूरच्या एसडीओ सुरभी सिंगला यांची बदली करून रघुनाथपूर पुरुलियाचे नवीन एसडीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT