हवामान विभागाचा सहा राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
तामिळनाडू आणि केरळमध्ये २६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज
२२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण भारतात पावसाचा जोर
उत्तर भारतात हवामान निरभ्र आहे, हिवाळ्याचे आगमन लवकरच होणार आहे, मात्र दक्षिण भारतात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ११ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दक्षिण तामिळनाडू व केरळच्या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये; २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान केरळमध्ये २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान लक्षद्वीपमध्ये; आणि २२ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
यासह २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर तर २७-२८ ऑक्टोबर रोजी ओडिशामधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २७-२८ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील सात दिवसांत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
तसेच २७-२८ ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह या आठवड्यात उत्तर पश्चिम, मध्य पश्चिम आणि पूर्वोत्तर भारताच्या हवामानात कोणताच बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. २२ ऑक्टोबर कोकण आणि गोव्यातील हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील सात दिवसांत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
यासह या आठवड्यात वायव्य, पश्चिम-मध्य आणि ई ईशान्य भारतातील हवामानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी कोकण आणि गोव्यातील हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी केरळ सरकारने अनेक पर्यटनस्थळांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. भारतीय हवामान विभागाने एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम आणि कोझिकोडसह अनेक जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. यासह २४ तास कार्यरत राहणारी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम्स) स्थापन करण्यात येणार आहे. हवामान विभागाचे इशारे मागे घेतले जाईपर्यंत ती कार्यान्वित राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.