Weather Update Google
देश विदेश

Weather Update : ऐन हिवाळ्यात पाऊस बरसणार, तर कुठे असेल सर्वाधिक थंडीचा कडाका? IMD चा रिपोर्ट वाचा

Weather Update News : ऐन हिवाळ्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर देशातील काही भागात सर्वाधिक थंडीचा कडाका पाहायला मिळणार आहे. या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने नागरिकांना अलर्ट केले आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख आणि आसपासच्या भागात १६ ते १७ डिसेंबर रोजी पावसाहित बर्पवृष्टी होण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात पावसाच्या शक्यतेने वातावरणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. वातावरणातील बदलामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

उत्तर प्रदेश, बिहारसहित अनेक राज्यात शीतलहरींचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे. मागील २४ तासांत तामिळनाडू भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर , लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा चंदीगड, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांना शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूत १७ आणि १८ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४ , १६-१९ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. केरळात १४,१८,१९ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. कर्नाटकात १७ आणि १८ डिसेंबर रोजी पावसाची अलर्ट देण्यात आला आहे. तर अंदमान आणि निकोबार द्वीपमध्ये १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी

उत्तर पश्चिम भारतात किमान तापमान ५-१० डिग्री सेल्लिअसवर पोहोचलं आहे. तर मध्य भारतात वातावरण १०-१६ डिग्री सेल्सिअसदरम्यान आहे. ओडिशा,गंगीय पश्चिम बंगाल, पश्चिम भारतातही १०-१६ डिग्री सेल्सिअसदरम्यान तापमान आहे. मागील २४ तासांत किमान तापमान एक ते दोन डिग्री सेल्सिअसने कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

पंजाबच्या आदमपूरच्या मैदानी भागात किमान तापमान ०.७ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उत्तर पश्चिम भारतात मागील २४ तासांत वातावरणात कोणताही बदल दिसून आला नाही. मध्य भारतात पुढील तीन दिवसांत किमान तापमान कोणताही बदल पाहायला मिळण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर दोन दिवसांत दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT