IMD Rain Alert in Maharashtra  Saam TV
देश विदेश

Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

IMD Rain Alert: येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. अशातच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Rain Alert) पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे.

लक्षद्वीपमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसासह (Heavy Rain) हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. केरळ, तामिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारी भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणाच्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे.

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असल्याने थंड वारे वाहत आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही जिल्ह्यात दाट धुक्याचा प्रभाव जाणवत आहे.

दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी बाप्पयुक्त वारे वाहत असून हवेतील आद्रता कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT