Delhi News Saam Tv
देश विदेश

दिल्लीकरांना मोठा दिलासा, सोमवारपासून खासगी कारमध्ये मास्क लावणे बंधनकारक नाही

दिल्ली सरकारने शनिवारी जारी केलेल्या आदेशात हा नवा नियम सोमवारपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली - कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी होत असताना केजरीवाल सरकारने दिल्लीतील (Delhi) जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना यापुढे मास्क (Mask) लावणे बंधनकारक असणार नाही. दिल्ली सरकारने शनिवारी जारी केलेल्या आदेशात हा नवा नियम सोमवारपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत खाजगी वाहनांमध्ये एकत्र प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) शनिवारी एका आदेशात म्हटले आहे की मास्कशिवाय पकडलेल्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. शुक्रवारी DDMAच्या बैठकीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावण्याचा दंड 2,000 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

DDMA बैठकीनंतर दिल्ली सरकारने शुक्रवारी सर्व कोविड निर्बंध उठवले आहेत. दिल्लीत नाईट कर्फ्यू हटवण्यात आला असून राजधानीतील सर्व शाळांना एप्रिलपासून नियमित कामकाज सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याचा दंडही 2000 रुपयांवरून 500 रुपयांवर आणण्यात आला आहे.

तथापि, महानगरपालिका क्षेत्रात एकापेक्षा जास्त आठवडी बाजाराला परवानगी देण्यासह काही निर्बंध अजूनही कायम आहेत. विवाहसोहळ्यात 200 व्यक्तींची मर्यादा आणि धार्मिक स्थळी पर्यटकांच्या प्रवेशावरील निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT