viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: सावधान! वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना छोटीशी चूक पडेल महागात, भीषण स्फोटाचा VIDEO VIRAL; एका सेकंदात...

Washing Mashine Blast Viral Video: खिशात राहिलेल्या एका गोष्टीमुळे वॉशिंग मशीनचा भीषण स्फोट झाल्याचे व्हिडिओ दिसत आहे.

Gangappa Pujari

Washing Machine Blast Viral Video: कपडे धुताना खिसे तपासून मगचं धुवायला घ्या, असे नेहमी सांगितले जाते. खिशात असलेले काही महत्त्वाचे पेपर्स किंवा वस्तू खराब होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. कारण कपडे एकदा बादलीत भिजत घातले की खिशातील वस्तू खराब झाल्याच म्हणून समजा. पण आजकाल अनेकजण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतात. मशीनमध्ये कपडे अगदी आरामात धुवून निघतात. पण वॉशिंग मशीनमध्येही खिशात राहिलेल्या वस्तू खराब होतात.

मात्र, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना अशा गोष्टींची काळजी घ्याच, कारण ही वस्तू तुमच्या जीवावरही बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात खिशात राहिलेल्या एका गोष्टीमुळे वॉशिंग मशीनचा भीषण स्फोट झाला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरातून बाहेर पडत असतानाच वॉशिंग मशीनचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिलं.

वॉशिंग मशिनमधील भीषण स्फोटाचा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter) @OnlyBangersEth या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

या मशीनमध्ये धुण्यासाठी टाकलेल्या कपड्यांमध्ये एका खिशात काही ज्वलनशील पदार्थ राहिला होता. ज्यामुळे मशीनमध्ये एक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्यामुळे मशीनचे तुकडे-तुकडे झाले शिवाय त्या वॉशिंग सेंटरचेही मोठे नुकसान झाले. या व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओला २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती लाँड्री सेंटरमध्ये कपडे घेऊन बाहेर जातो, तेवढ्याच त्या सेंटरमधील एक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जात असतात. पण अचानक ती मशीन ओपन होते आणि त्यातून काही कपडे बाहेर पडतात, तेवढ्याच मशीनचा एवढा मोठा स्फोट होतो की मशीनच नाही तर सेंटरचेही मोठे नुकसान होते.

सुदैवाने या स्फोटाच्या वेळी मशीनजवळ कोणी व्यक्ती उभी नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी ते नीट तपासले गेले नाही, त्यामुळे कोणत्यातरी पँट किंवा शर्टच्या खिशात एक ज्वलनशील पदार्थ राहिला, जो मशीनचा स्फोट होण्यास कारणीभूत ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT