Manual Washing Machine Saam TV
देश विदेश

Manual Washing Machine : काय सांगता! विजेचा वापर न करता चालातेय ही वॉशिंग मशिन; कुठे खरेदी करायची?

नवज्योत साल 2019 पासून या माशिनवर काम करत होता.

Ruchika Jadhav

Washing machine: कपडे धुण्यासाठी बराच वेळ वाया जातो. तसेच हाताने कपडे धुताना महिलांना हात आणि कंबरेच्या समस्या जाणवतात. यावर उपाय म्हणून आज शहरांमध्ये घरोघरी वॉशिंग मशिन आल्या आहेत. वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना जास्त पाणी लागते. तसेच विजेचाही जास्त वापर केला जातो. त्यामुळे खेड्यापाड्यात वॉशिंग मशिनचा वापर करणे टाळले जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? विजेशिवाय चालणारी आणि कमी मेहनत लागणारी एक वॉशिंग मशिन बाजारात आली आहे.(Latest Manual Washing Machine News)

या मशिनमध्ये कपडे धुताना तुम्हाला कोणतीही जास्तीची मेहनत घेण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही विजेचा वापर न करता या माशिनमध्ये कपडे स्वच्छ धुऊन निघतात. ब्रिटन येथे राहणाऱ्या नवज्योत साहनी या युवकाने ही वॉशिंग मशिन बनवली आहे. यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली. ही मशिन बनवल्याने त्याला पॉइंट ऑफ लाइट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतने त्याच्या या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. ही मशीन बनवण्याची कल्पना त्याला भारतात असतानाच सुचली होती. भारतात इंजिनिअरिंगची नोकरी सुटल्यावर त्याला ही मशिन बनवण्याची कल्पना सुचली.

शहरात विविध उपकरणे ही विजेवर चालतात. विजेचा जास्त वापर होतो यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना विजेची मोठी समस्या जाणवते. गावात तर अनेक ठिकाणी अजूनही वीज पोहचलेली नाही. त्यामुळे येथील महिला नदीचे पाणी घेऊन खडकावर कपडे धुताना दिसतात. यामध्ये त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच कपडेही स्वच्छ निघत नाहीत. त्यामुळे या व्यक्ती महागडी विजेवर चालणारी मशिन विकत घेऊ शकत नाहीत. याच कारणास्तव नवज्योत ने हातावर चालणारी कमी मेहनत आणि स्वच्छ कपडे धुतले जातील अशी मशिन बनवली असं त्याने मुलाखतीत म्हटलं आहे.

नवज्योत साल 2019 पासून या माशिनवर काम करत होता. या युवकाने बनवलेली ही माशिन आता विक्रीसाठी त्यावर झाली आहे. मात्र सर्वच देशाध्ये याची विक्री अजून सुरू झालेली नाही. आता पर्यंत एकूण 300 वॉशिंग मशिन विकल्या गेल्या आहेत. या मशिन काही मुलींची वसतिगृह, अनाथआश्रम, वृद्धाश्रम, शाळा अशा ठिकाणी देण्यात आल्यात. अमेरिकेत देखील या मशिनची मागणी वाढत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT