Air Raid Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine War: कीववर हवाई हल्ल्याचा इशारा! नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

युक्रेनच्या द कीव इंडिपेंडंटने कीवमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा दिला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

कीव: युक्रेनच्या द कीव इंडिपेंडंटने कीवमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा दिला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच माहितीनुसार, या युद्धाच्या भयामुळे पळून जाणाऱ्या युक्रेनमधील काही नागरिकांप्रती एकता, सहानुभूती दाखवत पोलंड आणि हंगेरीचे रहिवासी त्यांचे स्वागत करत आहेत.

दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता 10 दिवस झाले आहेत. असे असूनही, युक्रेनमधील अनेक शहरे अजूनही रशियन सैन्याच्या नियंत्रणाबाहेर आहेत. आता युक्रेनचा ताबा घेण्यासाठी सर्व शहरे जोपर्यंत रशियाला शरण येत नाहीत तोपर्यंत रशिया हवाई बॉम्बफेक करेल, अशी भीती अमेरिका आणि नाटोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रशियन हवाई हल्ल्यांमुळे येत्या काही दिवसांत नागरिकांच्या मृत्यूची संख्या आणखी वाढू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

युक्रेनमध्ये जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार: परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळ्या लागलेल्या भारतीय विद्यार्थ्या हरजोत सिंगचा वैद्यकीय खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सिंग यांच्यावर कीव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंग (31) हे 27 फेब्रुवारीला दोन जणांसाठी कॅबमध्ये बसून पश्चिम युक्रेनच्या लिव्ह शहरात कीव येथून जाण्याचा प्रयत्न करत होते. सिंग यांना चार गोळ्या लागल्या होत्या, त्यात एक गोळी छातीला लागली होती. तो दिल्लीचा रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT