Voter List Issue Saam Tv
देश विदेश

Voter List: मतदार यादीमध्ये अनियमितता, २ निवडणूक अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; सरकारची मोठी कारवाई

Voter List Issue: निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली. २ निवडणूक अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. मतदार यादीमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Priya More

उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील मतदार यादीत कथित अनियमितता आढळून आली होती. या प्रकरणात आता योगी सरकारने मोठी कारवाई केली. २ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दंडात्मक तरतूद जोडण्याचे निर्देशही देण्यात आलेत. सरकारच्या आदेसानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले.

निलंबित अधिकाऱ्यांमध्ये हेमंत कुमार चौधरी आणि मयंक गोस्वामी यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी पिलीभीत येथे उप जिल्हाधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नियुक्ती विभागाने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. या तपासाची जबाबदारी मोरादाबाद विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहे.

३१ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक आयोगाने मयंक गोस्वामी आणि हेमंत चौधरी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले. हेमंत कुमार आणि मयंक गोस्वामी या दोन्ही अधिकाऱ्यांची आरोपपत्रे चौकशीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात यावीत असे सांगण्यात आले आहे. आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करता येणार नाही.

निवडणूक आयोगाने हे दोन्ही अधिकारी आणि मतदार नोंदणी केंद्राचे संगणक ऑपरेटर अनिल कुमार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या विद्यमान एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १९८ चा समावेश करण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रकरणांमध्ये कठोर तिघांमध्ये कठोर कारवाई करण्यात यावी असे देखील सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे आता चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job : सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम, जाणून घ्या महत्त्वाची अट

Gold Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण! 2,800 रुपयांनी भाव कोसळला, चांदीही झाली स्वस्त

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून नियोजित हत्या! रोहिणी खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

Mumbai-Pune : विकेंडला फिरण्यासाठी लांबचा प्रवास कशाला? मुंबई-पुण्याजवळ वसलंय 'हे' ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स

पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या पाच जणांना अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई, पाच दुचाकी जप्त!

SCROLL FOR NEXT