Viral Video Snake  Saam TV
देश विदेश

Viral Video: दोन तरुणी चक्क अजगराला घेऊन पोहचल्या हॉटेलमध्ये; पुढे जे घडलं ते भयंकरचं...

जेवणासाठी बाहेर आलेल्या दोन तरुणी आपल्या भयंकर अजगराला घेऊन आल्या आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video: वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना पाळणे हा आता एक छंदच झाला आहे. माणसं आपल्या आवडीप्रमाणे माकड, कुत्रा, मांजर असे प्राणी पाळतात यात काही महानग असेही आहेत ज्यांना चक्क साप पाळायला सुद्धा आवडतो. बाहेर जेवायला जाताना काही व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांना देखील बरोबर आणतात. अशात दोन तरुणी चक्क आपल्या महाकाय भल्यामोठ्या अजगराला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला आल्या आहे. एकूणच हे दृश्य पाहून हॉटेल मालकाच्या काळजात धडकी भरली आहे. (Latest Snake Viral News)

जेवणासाठी बाहेर आलेल्या दोन तरुणी आपल्या भयंकर अजगराला घेऊन आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हॉटेलमध्ये इतर व्यक्ती देखील या तरुणींचा प्रतापपाहून थरथर कापू लागलेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणी त्या अजगराला जेवणाच्या टेबलावर ठेवतात. तिथेच त्यांना जेवण वाढलं जातं. आपल्या अजगराबरोबर त्या मोठ्या आनंदात आणि चवीने मेजवानीचा आस्वाद घेत आहेत. यात अचानक त्या अजगराला भरवतानही दिसत आहेत. एका तरुणीने जेवण दिल्यावर अजगर हळूहळू दुसऱ्या तरुणीच्या तोंडाजवळ जातो. एका क्षणासाठी आता अजगर तरुणीचा चावा घेणार असेच वाटते. मात्र तसे काही होत नाही.

काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ilhanatalay या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच तब्बल १३ कोटी व्यक्तींनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर लाखोंनी याला व्युव्ज मिळाले आहेत. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं म्हटलं जातं आहे. टेबलावर असलेला अजगर काळ्या रंगाचा असून त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत. हे भयानक दृश्य अनेकांच्या काळजात धडकी भरवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT