Agra Tourist Beaten Saam TV
देश विदेश

Agra Tourist Beaten CCTV Footage : ताजमहाल पाहायला गेला अन् आयुष्यभरासाठी कटू आठवण घेऊन आला; पर्यटकाला टोळक्याची बेदम मारहाण

Viral Video : मारहाण झालेला पर्यटक दिल्लीहून ताजमहल पाहण्यासाठी आल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Agra Viral Video : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका पर्यटकाला काठीने मारहाण केल्याचा  व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलिसांना आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मारहाण झालेला पर्यटक दिल्लीहून ताजमहल पाहण्यासाठी आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा धक्का लागल्यावरुन हा वाद झाला. या वादानंतर पर्यटकाला मारहाण झाली. या प्रकरणावर काँग्रेसने योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सोमवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. दिल्लीतील एक पर्यटक ताजगंजच्या बसाई चौकी भागात आग्रा येथील ताजमहाल पाहण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याच्या गाडीता परिक्रमेसाठी आलेल्या लोकांना धक्का लागला. त्यानंतर सुमारे १०-१५ लोकांनी एकत्र येत या पर्यटकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. (Latest Marathi News)

दरम्यान पीडित व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी जवळच्या दुकानात शिरला. मात्र टोळक्याने त्याचा पिछा काही सोडला नाही. दुकानात शिरुन त्याला बेदमम मारहाण केली. पर्यटकासोबत झालेल्या मारहाणीची ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (Uttar Pradesh News)

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींची ओळख पटवण्यासाठी तीन पथके तयार केली आणि पाच जणांना अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची नांदेड पोलिसांनी काढली धिंड

Protein Deficiency: प्रोटीनची कमतरता असल्यास शरीर देतं 'असे' संकेत

Pune To Madgaon Torism: पुण्याहून मडगावला निघालात? वाचा रेल्वे, बस आणि फ्लाइटचे संपूर्ण माहिती

Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील त्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र; २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

SCROLL FOR NEXT