Telangana News Saamtv
देश विदेश

Telangana Elections: 'कुठलंही बटण दाबा, कोणालाही मत द्या, मीच जिंकणार... भाजप खासदाराचे खळबळजनक विधान; व्हिडिओ व्हायरल

Mp Arvind Dharmapuri Video: तेलंगणाच्या निजामाबाद मतदारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

Gangappa Pujari

Telangana Election: अलिकडच्या काही वर्षांमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. विरोधकांकडून नेहमी केंद्र सरकार एव्हीएम मशिमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप केला जातो. आता एका भाजप खासदाराच्याच वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण काय?

सोशल मीडियावर सध्या एका भाजप खासदाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तेलंगणातील खासदार धर्मपुरी अरविंद (Arvind Dharmapuri) यांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये ते "तुम्ही नोटाचं बटण दाबा, मीच जिंकेन. तुम्ही गाडीवर मत द्या, मीच जिंकेन. तुम्ही हातावर मत द्या, मीच जिंकेन. मी तुमच्या फायद्यासाठी इथे आलोय. येणार तर मोदीच”, असे म्हणताना दिसत आहेत.

बुधवारी तेलंगणाच्या निजामाबाद मतदारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. हे वक्तव्य गांभीर्याने घेत तपास करण्याची मागणी बीआरएस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, ईव्हीएम मशिनमध्ये घोळ होत असल्याचा दावा विरोधकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. यावर निवडणूक आयोगाने मात्र असा फेरफार करणे शक्य नसून ईव्हीएम मशीन पुर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. मात्र आता भाजप खासदाराच्या या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT