Pet Dog Viral Video saam tv
देश विदेश

Viral Video : पाळीव कुत्रा आणि युवकाचा अनोखा दोस्ताना; खांद्यावर बसवून चालवतो शहरभर सायकल , व्हिडिओ व्हायरल

काही लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. त्याचं एक उदाहरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

Pet Dog Viral Video : माणूस आणि प्राण्याचं नातं अनोखं असतं. अनेक माणसं त्यांच्या पाळीव प्राण्याची फार काळजी घेतात. काही लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. त्याचं एक उदाहरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युवक पाळीव कुत्र्याला चक्क खांद्यावर बसवून सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे. (Latest Marathi News)

इन्टाग्रामवर @Zorovlog नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओमधून युवक आणि पाळीव कुत्र्याचं नातं समोर आलं आहे.

पाळीव प्राणी प्रेमी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. अनेकदा सोशल मीडियावर दुचाकीवर पाळीव कुत्रे बसलेले व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, या युवकाच्या थेट खांद्यावर पाळीव कुत्रा बसला आहे. त्यामुळे हा अनोखा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सदर व्हिडिओमध्ये युवक हा सायकल घेऊन रस्त्यावर घेऊन उभा दिसत आहे. त्यानंतर अचानक त्याच्याजवळ एक पाळीव कुत्रा येतो. तो चक्क त्या युवकाच्या खांद्यावर बसला. त्यानंतर दिमाखात त्याच्या खांद्यावर उभा राहिला. युवकही बिनधास्त सायकल चालवताना दिसत आहे.

नेटकऱ्यांना व्हिडिओ प्रचंड भावला

या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक व्हिव्स मिळाले आहेत. या व्हिडिओ वर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पाळीव कुत्रा आणि युवकाच्या नात्यावर भरभरून लिहिलं आहे. तर एका नेटकऱ्यांने पाळीव कुत्रे माणसावर किती विश्वास करतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Maharashtra Live News Update: नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT