Wedding Fight Viral Video Saam Tv
देश विदेश

Video: तुफान राडा! पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी; एकमेकांच्या जीवावर उठले

नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं

Shivani Tichkule

Wedding Fight Viral Video: लग्नात हाणामारी झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र, त्यांच्या हाणामारी आणि भांडणाचे कारणही नक्कीच मोठं असेल. तर काही वेळा छोट्या छोट्या गोष्टीवरूनदेखील लग्नात मोठे वाद होतात. अशीच एक घटना केरळमधील (Kerala) अलप्पुझा येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अलप्पुझा येथील एका लग्नात चक्क पापडासाठी तुफान राडा झाला. एका पापडावरून यात नवरी आणि नवरदेवाकडील लोक एकमेकांच्या जीवावर उठले. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पापडावरून झालेल्या या भांडणात सहा जण जखमीही झाले असल्याची माहिती समोर येत आहे. वरदेवाकडील काही लोकांनी जास्तीचे पापड मागितले होते मात्र त्यांना नकार देण्यात आला आणि त्यानंतर नवरी आणि नवरदेवाकडील लोकनामध्ये हाणामारी सुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना जोडे आणि चप्पल मारताना दिसत आहेत. लोकांनी एकमेकांना मारण्यासाठी खुर्च्या आणि टेबलचा देखील वापर केला.

अलप्पुझा येथील मुत्तोम येथील एका लग्न मंडपात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटने प्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवरदेवाकडील काही लोकांनी आणखी पापड मागितले, जे केटरिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी देण्यास नकार दिला, आणि त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली सुरुवातीला त्यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर याचं हाणामारीत रूपांतर झालं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT