CCTV Footage Saam TV
देश विदेश

Accident CCTV Footage : बाईकस्वाराचा अंगावर भलमोठं झाड कोसळून जागीच मृत्यू; थरारक घटनेचा VIDEO समोर

Tree Collapse News : प्रवीण आचार्य असं झाड कोसळून मृत्यू झालेल्या बाईकस्वाराचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral News : कर्नाटकमधील पडुबिद्री-बेलमन रोडवर गुरुवारी रात्री भलंमोठं झाड अंगावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रवीण आचार्य असं झाड कोसळून मृत्यू झालेल्या बाईकस्वाराचं नाव आहे.

प्रवीण हा पाडुबिद्री-बेलमन रस्त्यावरून जात असताना बेलमन शहरात एक मोठे झाड अचानक कोसळलं. यावेळी त्याच्या पुढे एक कार जात होती आणि कारच्या मागे बाईकस्वार होता. मात्र कार पुढे जाताच भलंमोठं झाड कोसळलं. (Crime News In Marathi)

झाड अंगावर पडल्यानंतर बाईकस्वार त्यात अडकला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे लोक रस्त्यावर मदतीला धावून आले. स्थानिकांनी प्रवीणला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. (Latest News)

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाला होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्तेवाहतूक सुरळीत केली. पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घेण्याची गरज असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT