Bus Accident Viral Video Saam Tv
देश विदेश

MP Bus Accident: भरधाव बस २५ प्रवाशांसह थेट नदीत कोसळली, थरारक VIDEO आला समोर

Bus Accident Video: भरधाव बस २५ प्रवाशांसह थेट नदीत कोसळली, थरारक VIDEO आला समोर

Satish Kengar

Madhya Pradesh Bus Accident Video:

मध्य प्रदेशातील खरगोन येथे गुरुवारी 25 प्रवाशांना घेऊन जाणारी बस 20 फूट उंच पुलावरून नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

अपघात झालेल्या बसच्या पाठीमागून येत असलेल्या वाहनाच्या डॅश कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा अपघात गोगवा पोलीस ठाण्याजवळील खरगोन येथे सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास घडला आहे.

बसचा एक टायर फुटल्याने बस उलटून नदीत कोसळली, असं सांगण्यात येत आहे. रोडिया गावाजवळ नदीवर बांधलेल्या 20 फूट उंच पुलावरून ही बस जात असताना हा अपघात घडला आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी निघालेली बस खरगोन जिल्ह्यात थांबलेल्या ट्रकला धडकली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कासरवाड पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

खरगोन जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन अमरसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 जखमी प्रवाशांना रुग्णालयात आणण्यात आले. बहुतेक जखमींना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तसेच गंभीर जखमी झालेल्या एकाला पुढील उपचारांसाठी इंदूरला पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT