Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: अरेरे, खतरनाक! हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी अडवले, पठ्ठ्याने त्यांना रॅप सॉंगचं ऐकवले; VIDEO तुफान VIRAL

Driving Without Helmet Boy Viral Video: पोलिसांच्या कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी चक्क गाणं गायला सुरुवात करतो, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Gangappa Pujari

Traffic Police Viral Video: पोलिसांना पाहताच प्रत्येकाची भंबेरी ही उडतेच. माणूस कितीही धाडसी असला तरी पोलिसांना पाहताच धडकी भरतेच. हे पोलिस जर गाडी चालवताना रस्त्यावर दिसले तर पळापळ ही ठरलेलीच असते. मात्र सध्या एका तरुणाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याचे कारण म्हणजे या तरुणाने पोलिसांसमोर केलेला कारनामा. हेल्मेट न घालता गाडी चालवल्याने पोलिसांनी अडवल्यानंतर या तरुणाने थेट त्यांना जबरदस्त रॅपच सुणावला. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील (Viral Video) कथा, चला जाणून घेवू....

अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिस आपल्याला अनेक नवनवे नियम सांगत असतात. ज्याची अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य असते. मात्र अनेकदा वाहन चालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही, ज्यामुळे त्यांना दंड करावा लागतो. सध्या अशाच एका विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमधील तरुणाने त्याला थांबवल्यानंतर असा कारनामा केलाय जो पाहून तुम्हीही चकित व्हाल..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांना पाहताच तरुण बाईक थांबवतो. पोलिसांसह काही लोकांनी त्या तरुणाला घेरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे इच्छा असूनही तेथून पळ काढणं अशक्य असल्याचं तरुणाच्या लक्षात येताच तो पोलिसांच्या कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी चक्क गाणं गायला सुरुवात करतो.

हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर (Instagram) तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीही झालं तरी दंड माफ करु नका, अशी प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी त्याने गायलेल्या गाण्यातून मोलाचा संदेश दिल्याचे सांगत या तरुणाचे कौतुकही केले आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT