Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: लग्नाला नकार देताच चिडला, केस पकडून वार करत भर चौकातून फरफटत नेले; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Gangappa Pujari

chhattisgarh: देशात प्रेम प्रकरणातून हत्या, महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने अवघा देश हादरला होता. ही घटना ताजी असतानाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला केस पकडून ओढताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजली असून हा व्हिडिओ छत्तीसगडमधील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे. (Viral Video)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण अल्पवयीन मुलीला केस पकडून फरफटत नेताना, सपासप वार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हा व्हिडिओ रायपूरच्या गुडयारी भागातील आहे. शनिवारी रात्री एक तरुण एका अल्पवयीन मुलीचे केस ओढत रस्त्यावरून जात होता. मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी ओंकार तिवारी उर्फ मनोज (47) या आरोपीच्या दुकानात काम करत होती. या मुलीकडे तिवारीने लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु पीडितेच्या आईने हा प्रस्ताव फेटाळला होता. रागाच्या भरात आरोपीने अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून तिला रस्त्यावर ओढले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते आरोपीच्या घरी पोहोचले. तर तिथेही ओंकार तिवारीने गोंधळ घातला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने पोलिसांना आत्महत्येची धमकी दिल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT