Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Viral Video: दिल्ली मेट्रो कायम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. पुन्हा दिल्ली मेट्रो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. नक्की काय घडले असेल मेट्रोत त्यासाठी नक्की व्हायरल व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील अनेक घटना पाहण्यास मिळतात. त्यात अनेक व्हिडिओ दिल्ली शहरातील असून खास करुन दिल्ली मेट्रोमधील असतात. दिल्ली मेट्रो सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी राहिलेली नसून जगभरातल्या नेटकऱ्यांच्या मनोरंजनाचे एक माध्यम झालेले आहे. परत एकदा दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात अश्लील डान्स नसून चक्क काही व्यक्ती मेट्रोमध्ये असलेल्या भरगर्दीत पत्ते खेळताना दिसत आहे.

दिल्ली(Delhi) मेट्रोमधील पत्ते खेळत असलेल्या पुरुष प्रवाशांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फक्त व्हायरल होत नसून व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी दिल्ली मेट्रोत महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये हाणामारी शिवाय अश्लील डान्स आणि कपलचे अश्लील कृत्य हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या पत्ते खेळणाऱ्या पुरुष प्रवाशांचा व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. यामध्ये तुम्हाला मेट्रोमधील एक कंपार्टमेंट दिसून येईल. कंपार्टमेंटमध्ये या पुरुषांची मोठी गर्दी आहे. तर त्यामध्ये एका प्रवाशाने मोबाईलचा कॅमेरा सुरु करुन मेट्रोमधील एक प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की, चक्क मेट्रोच्या असलेल्या भर गर्दीत खाली बसून काही व्यक्ती पत्ते खेळत आहेत. या लोकांना पाहून मेट्रोमधील अनेक व्यक्ती हसताना दिसत आहेत.

दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर व्हायरल होत असून तो व्हिडिओ '@rocky_paswan__ji's'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ ४ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत तब्बल ९३ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. तर अजूनही असंख्य व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, ''तरुणींच्या अश्लील नृत्यापेक्षा हे तरी काहीसे चांगले आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' ही लोक काही सुधरणार नाही'' तर अनेकांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT