Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News : तावातावात चुंबन घेणं पडलं महागात; मॉडेलची जीभच तुटली

तुर्कीमधील एका मॉडेलला पहिलं चुंबन घेणं चांगलंच महागात पडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral News : आयुष्यातील पहिलं प्रेम आणि पहिलं चुंबन कोणी सहजासहजी विसरू शकणार नाही. या आठवणी लवकर विसरण्याजोगे नसतात. मात्र, तुर्कीमधील एका मॉडेलला पहिलं चुंबन घेणं चांगलंच महागात पडलं आहे. (Latest Marathi News)

तावातावात चुंबन घेताना तिची जीभ तुटली. त्यामुळे मॉडेलला तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. हे वृत्त इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रचंड व्हायरल होत आहे.

३४ वर्षीय मॉडेल सेडा एर्सोई Ceyda Ersoy ने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. सेडा म्हणाली की, मी पहिल्यांदा प्रियकरासोबत डेटवर गेली होती. आम्हा दोघांना फ्रेंच पद्धतीचं चुंबन घेताना नियंत्रण राहिलं नाही. यावेळी माझ्या प्रियकराचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही'.

'तावातावात चुंबन घेताना माझी जीभ तुटली. त्यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर मला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीभ कापली गेल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मी पहिली व्यक्ती असेल, की चुंबन घेताना जीभ तुटली गेली असेल. हे हसण्यासारखं मुळीच नाही. मला फार वेदना होत आहेत', असे सेडा पुढे म्हणाली.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, सेडाने चाहत्यांचे आभार मानताना म्हणाली, 'मित्रांनो, मी आता ठीक आहे. तुम्ही आपुलकीने काळजी घेण्याचे संदेश पाठवले, त्याबद्दल आभारी आहे. शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली आहे. डॉक्टरांनी जीभेवर शस्त्रक्रिया केली. आता काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितली आहे'.

'माझ्या प्रियकराला माहीतच नव्हते की, फ्रेंच पद्धतीचं चुंबन कसं घ्यायचं? त्यामुळे ही घटना घडली. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखू शकली नाही. आमची केवळ एक महिन्याची ओळख आहे', असेही ती पुढे म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT