Viral Video
Viral Video  Saam TV
देश विदेश

Viral Video : नाद करा पण आमचा कुठं...; पठ्यानं कोल्हापुरी चपलेलाही टाकलं मागे, पाय पडताच होईल विषारी दंश

Ruchika Jadhav

Viral Video News: आजवर तुम्ही अनेक चपला, पादत्राणे पाहिली असतील. ऋतूनुसार प्रत्यके व्यक्ती आपली चप्पल बदलत असतो. यात पावसाळा आला की, रबराचे शूज किंवा साधी स‌ॅंडल घेतली जाते. काही व्यक्ती ऋतूबरोबरच फॅशन आणि ट्रेण्ड नुसार देखील चपला बदलतात. लग्न सोहळा असल्यास त्यावर मोजडी घातली जाते तसेच टाय कोट असल्यास त्यावर फॉर्मल शूज घातले जातात. (Latest Viral Video)

महिलांमध्ये देखील विविध प्रकारच्या चपला पाहायला मिळतात. कोल्हापूरमध्ये अस्सल कोल्हापुरी चपलेचा रुबाब काही औरचं आहे. पायात घालताच या चपलेने मोठा रुबाब येतो. अशात सोशल मीडियावर सध्या एक अनोखे शूज जोरदार व्हायरल होतं आहेत. यामध्ये एका व्यक्तीने चक्क नागाचा फणा असलेली चप्पल घातली आहे.

14 फेब्रुवारी रोजी या व्यक्तीने आपले या बुटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्यक्तीने हे फोटो शेअर करत याला भन्नाट कॅप्शन देखील दिलं आहे. यावर त्याने लिहिलं आहे की, नागचरण आणि नाग राजाची बूटं असं त्याने लिहिलं आहे.

बुटांचा हा अनोखा प्रकार पाहून नेटकरी थक्क झालेत. या व्यक्ती असे बूट बनवण्याची कल्पना नेमकी कुठून आली असा विचार करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवण्यासाठी किती बारीक काम केलं आहे. बुटांवर त्याने काही उंच अंतरावर हा फणा बनवला आहे. तसेच पटकन याकडे नजर गेल्यावर खरोखर नाग आहे की, काय असा भास होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

Today's Marathi News Live : नाशिकच्या मालेगावात ग्रामस्थांनी केला रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT