Satyendar Jain Saam Tv
देश विदेश

Video: जेल आहे की मसाज सेंटर? आपच्या नेत्याला तुरुंगातही VIP ट्रीटमेंट

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत, नुकताच त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

वृत्तसंस्था

Satyendar Jain : मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हयरल होत आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगत जैन यांचा चक्क मसाज करतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आरोपींना तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते काय असा प्रश्न यानिमत्त उपस्तिथ होत आहे. व्हिडिओमध्ये ते वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये जैन मसाज करताना दिसत आहेत

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या बॅरेकमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. हे फुटेज 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर 2022 चे आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन आपल्या सेलमध्ये मसाज करताना दिसत आहेत. तुरुंगाच्या कोठडीत एक अज्ञात व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसत आहे.

याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत. जैन यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, ते तिथे आरामदायी जीवन जगत आहेत, असे प्रतिज्ञापत्र ईडीने न्यायालयात दाखल केले. प्रतिज्ञापत्रातही जैन यांना मसाज दिल्याचा उल्लेख आहे. 

सत्येंद्र जैन तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. सत्येंद्र जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुरुंग बदलण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT