Brij Bhushan Sharan Singh Saam tv
देश विदेश

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांनी माझंही लैंगिक शोषण केलं, महिला कुस्तीपटूचा खळबळजनक दावा

Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांनी माझंही लैंगिक शोषण केलं. त्यांच्याविरोधात तक्रार केलेल्या त्या ६ जणांमध्ये मी एक होती, असा खळबळजनक दावा विनेश फोगाटने केला.

Priya More

Summary -

  • विनेश फोगाट यांचा गंभीर आरोप

  • ब्रिजभूषण शरण सिंह यांनी माझंही लैंगिक शोषण केलं

  • ब्रिजभूषण शरण सिंह वाद पुन्हा चर्चेत

कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या ६ महिला कुस्तीपटूंपैकी आपण एक असल्याचे विनेश फोगाटने उघड केले आहे. त्यांनी गौंडा येथे १० ते १२ मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेसाठी आज नोंदणी केली. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत हा खळबळजनक दावा केला.

विनेश फोगाट यांनी रविवारी इशारा दिला की, गोंडा येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय खुल्या मानांकन कुस्ती स्पर्धेदरम्यान तिच्यासोबत किंवा तिच्या संघातील सदस्यांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला भारत सरकार जबाबदार असेल. त्यांनी या स्पर्धेत पक्षपाती निर्णयांचीभीतीही व्यक्त केली. गेल्या १८ महिन्यांपासून विनेश फोगाट कुस्तीपासू दूर आहे. १८ महिन्यांनंतर पुनरागमन करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. १०० ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे विनेश फोगाटला २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक गमवावे लागले होते.

विनेश फोगाट म्हणाल्या की, 'मी गेल्या दीड वर्षांपासून कुस्तीच्या मॅटपासून दूर होते. पण अलीकडेच मी पुन्हा तयारी सुरू केली आहे. मी खूप प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम करत आहे. जसे मी पूर्वी पदके जिंकली आहेत त्याचप्रमाणे पुन्हा मॅटवर परत येऊन पदक जिंकावे आणि आपल्या राष्ट्रध्वजाला सन्मान मिळवून द्यावा अशी माझी इच्छा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सर्वांना काही महत्वाचे सांगायचे आहे. एक महिन्यापूर्वी कुस्ती महासंघाने एका स्पर्धेची घोषणा केली. ही स्पर्धा उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित केली जात आहे. जो ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जिल्हा आहे आणि जिथे त्यांचे खासगी महाविद्यालय आहे. अशा ठिकाणी मेहनत करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचा हक्क मिळणे जवळजवळ अशक्य आहे.

विनेश फोगाट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, 'भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे लोकं संबंधित ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेच्या निकालावर प्रभाव टाकू शकतात. ब्रिज भूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंपैकी मी एक आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून साक्षीदारांची तपासणी सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान माझ्यासोबत, माझ्या संघासोबत किंवा माझ्या समर्थकांसोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी भारत सरकार जबाबरदार असेल. या स्पर्धेदरम्यान पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहवे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT