Vijay Thalapathy  Saam tv
देश विदेश

Vijay Thalapathy : राजकारणात फिल्मी तडका! आणखी एका सुपरस्टारची राजकारणात उडी, गाण्यातून मांडली पक्षाची विचारधारा

Vijay Thalapathy : तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एक सुपरस्टार राजकारणात उतरला आहे. विजय यांच्या पक्षाच्या गाण्यातून त्यांची विचारधारा समोर आली आहे.

Vishal Gangurde

श्रृती खैरे, साम टीव्ही

मुंबई : लाखोंची गर्दी, उसळलेला चाहत्यांचा जनसागर, तामिळ सुपरस्टार विजय यांच्या राजकीय पक्षाची सभा जोरदार पार पडली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ‘तामिळनाडू वेत्री कळघम’पक्षाची (टीवीके) स्थापन केली. सुपरस्टार विजय यांनी राजकारणात प्रवेश करताच इतर पक्ष बुचकाळ्यात पडले आहेत. सुपरस्टार विजय यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा देखील स्पष्ट केली आहे.

विजय यांनी ऑगस्टमध्ये पक्षाच्या झेंड्याचं आणि गाण्याचं अनावरण केलं. पण पक्षाच्या पहिल्या सभेत लावलेले हे बॅनर आणि सभास्थळी झालेली तुफान गर्दी पाहून सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. त्यांच्या सभेत एका बॅनरमध्ये डावीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि उजवीकडे पेरियार होते. या दोन्ही महापुरुषांच्या मध्यभागी अभिनेते विजय होते.

सुपरस्टार विजय यांच्या पक्षाच्या गाण्याने त्यांची विचारधार देखील स्पष्ट केली आहे. ‘सगळे जन्मतःच समान आहेत’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या गाण्यात पेरियार, आंबेडकर आणि इतर महापुरुषांची शिकवणुकीवर पक्षाची विचारधारा आधारित आहे. तसेच गाण्यात एक जात, धर्म आणि लिंग यावर भेदभाव न करणारा समतापूर्ण समाज निर्माण करणं हे पक्षाचं ध्येय असणार असल्याचं सांगितलं आहे.

येत्या 2026 च्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करत असल्याची माहिती देताना विजय यांनी त्यांच्या लोकप्रियतेवर विश्वास व्यक्त केलाय. या सभेसाठी जवळपास २ लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती होती. यामुळे इतर पक्षांसाठी तामिळनाडूच्या राजकारणातली नवीन चुरस होण्याची शक्यता आहे. यावेळी विजय यांनी सांगितलं की येणारा 'थलपती 65' हा त्यांचा शेवटचा सिनेमा असणार आहे. आता पुढील काळात ते राजकारणाचे 'थलपती' होणार असल्याचे जाहीर केले आहे

कोण आहेत विजय थलपती ?

विजय हे तामिळनाडूत सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. त्यांच्या आगामी 'थलपती69' सिनेमासाठी १०० कोटी मानधन घेत आहे. मानधन घेण्याच्या बाबतीत विजय यांनी रजनिकांत यांनाही मागे सोडलं आहे. रजनीकांत यांनी 'दरबार' सिनेमासाठी ९० कोटी मानधन घेतलं होतं. विजय यांचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे.

ते चाहत्यांमध्ये थलपती म्हणून प्रसिद्ध आहेत. विजय यांचं वडील प्रसिद्ध दिग्ददर्शक आहे. विजय हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत डेब्यू केलं. विजय यांनी आतापर्यंत ६५ सिनेमात काम केलं आहे. विजय यांची आई शोभा चंद्रशेखर प्रसिद्ध गायिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT