Venezuela Accident News Saam TV
देश विदेश

Venezuela Accident News : भरधाव ट्रकची १७ वाहनांना धडक, १६ जणांचा होरपळून मृत्यू, पाहा VIDEO

Venezuela Accident News : भीषण अपघाताच्या काही वेळ आधी महामार्गावर एक छोटा अपघात झाला होता. ज्यानंतर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता. ट्रकमध्ये केमिकल भरलेले असल्याने धडकेनंतर आगीचा भडका उडाला.

प्रविण वाकचौरे

Venezuela Accident News :

व्हेनेझुएलामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राजधानी कराकसजवळील महामार्गावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात १७ वाहने जळून खाक झाली. तर १६ जणांचा होरपळून मृत्यू जाला आहे. गुरुवारी सकाळी देखील मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भीषण अपघाताच्या काही वेळ आधी महामार्गावर एक छोटा अपघात झाला होता. ज्यानंतर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता. त्यावेळी तेथे एका भरधाव ट्रकने इतर वाहनांना जोरदार धडक दिली. ट्रकमध्ये केमिकल भरलेले असल्याने धडकेनंतर आगीचा भडका उडाला. ही आग पसरत गेली आणि इतर वाहने यात जळून खाक झाली. (Latest News Update)

खराब हवामानामुळे अपघात

खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता आहे. पहिल्या अपघातात ट्रक आणि 3 वाहनांची टक्कर झाली. यानंतर महामार्गावर ठप्प होऊन अनेक वाहने रस्त्यावर उभी होती. त्यानंतर दुसरा ट्रक येऊन वाहनांना धडकला.

खराब हवामानामुळे ड्रायव्हरला जाम दिसला नसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हायवेचा रस्ता चांगला नसून त्याची देखभालही व्यवस्थित होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्ते अपघातानंतर पोलिसांनी सांगितले की, ही एक मल्टी व्हेइकल टक्कर होती, ज्यामध्ये अनेक वाहने एकमेकांवर आदळली. महामार्गावरील अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT