Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express saam news
देश विदेश

Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express: रुळावरुन घसरली; प्रवासी सुखरुप

या रेल्वेतील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे अधिकारी यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

गाेवा : वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्स्प्रेस (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express) आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास गाेव्यानजीकच्या दूधसागर (Dudhsagar) आणि कॅरनझोल (Caranzol) दरम्यान रुळावरून घसरली. या रेल्वेच्या पुढची चाकांची जोडी रुळावरून घसरल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेले नाहीत. (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express latest news)

रेल्वे (railway) अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनचा संपूर्ण भाग सुरक्षित आहे. एआरटी (अपघात निवारण ट्रेन) द्वारा दूधसागरला (goa) रेल्वे आणण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या अपघातात (accident) सर्व सुरक्षित असल्याचे अधिकारी यांनी नमूद केले.

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसला लोकोमोटिव्हच्या उपकरणांमध्ये समस्या निर्माण झाल्याने अपघात होऊन नुकतेच नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT