Varanasi BJP Leader Warns Legal Action Against Defamation Saam
देश विदेश

सेxxx रॅकेटचा पर्दाफाश, भाजप महिला नेत्यावर आरोप, संतप्त होत सांगितलं तो फ्लॅट नेमका कुणाचा?

BJP Leader Warns Legal Action Against Defamation: वाराणसीत पोलिसांकडून फ्लॅट अन् स्पावर धाड. वेश्याव्यवसाय उघड. ९ तरूणी अन् ४ तरूणांना घेतलं ताब्यात.

Bhagyashree Kamble

भाजप नेत्या शालिनी यादव यांच्या वाराणसी येथील फ्लॅटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी फ्लॅटवर धाड टाकली. तसेच ९ तरूणी आणि ४ तरूणांना ताब्यात घेतलं. दरम्यान, या प्रकरणामुळे महिला नेत्याच्या अडचणीत वाढ झाली. हे प्रकरण चिघळल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत शालिनी यादव यांनी सांगितले की, त्यांचा स्पाशी काहीही संबंध नाही. २६ वर्षांपासून हा फ्लॅट भाड्याने दिला आहे. भाडे करारात स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की, कोणत्याही अनैतिक कृत्यांना परवानगी दिली जाणार नाही. घरमालकाच्या नावाने सोशल मीडियावर त्यांचं नाव जोडले जात असल्यामुळे शालिनी यादव यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शालिनी यादव यांनी यावेळेस नेटकऱ्यांना थेट इशाराही दिला आहे. त्यांनी नाव बदनाम करणाऱ्यांवर केस दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री वाराणसीतील एका विशेष पथकाने फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दोन्ही ठिकाणांहून पोलिसांनी नऊ महिला आणि चार पुरूषांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा फ्लॅट शालिनी यादव यांच्या पतीच्या नावावर असल्याकारणाने त्यांचं नाव या प्रकरणात घेतलं जात आहे. या प्रकरणाबाबत शालिनी यादव आणि त्यांचे पती अरूण यादव यांनी पत्रकार परिषद घेतली.

अरूण यादव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी शक्ती शिखा बिल्डिंगच्या फ्लॅट क्रमांक ११२ मधून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. १९९९ सालापासून ते या फ्लॅटचे मालक आहेत. अरूण यादव हे महमूरगंजमध्ये राहतात. म्हणून करार केल्यानंतर गेल्या २६ वर्षांपासून ते हा फ्लॅट भाड्याने देत आहेत. दरम्यान, चंदौली येथील अश्विनी त्रिपाठी यांनी हा फ्लॅट १ एप्रिल २०२५ रोजी भाड्याने घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IndiGo Flight: मुंबई-दिल्ली, मुंबई-पुणे, विमानाचे तिकीट ५०-६० हजारांवर; एअरलाइन्स कंपन्यांकडून लुटामार सुरू

Maharashtra Live News Update: कल्याणात जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीचा रस्ता बंद

Shoes And Socks Benefits: बुटांमध्ये सॉक्स का घालतात? कारण काय?

वरळीत ठाकरेसेना–भाजपमध्ये जोरदार राडा; शिवसैनिकांकडून फलकाची तोडफोड|VIDEO

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण

SCROLL FOR NEXT