Ireland News Saam TV
देश विदेश

Ireland News: सलग दुसऱ्यांदा समलैंगिक वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान

आयर्लंडच्या प्रधानमंत्री पदी पुन्हा एकदा मुळचे भारतीय आणि समलैंगिक असलेले लियो वराडकर विराजमान झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Ireland News: आयर्लंडच्या प्रधानमंत्री पदी पुन्हा एकदा मुळचे भारतीय आणि समलैंगिक असलेले लियो वराडकर विराजमान झाले आहेत. या आधी साल २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत फाइन गेलचे नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या नावे दोन मोठे विक्रम नोंदवले. निवडणूकीत ६० टक्के मतांनी त्यांचा विजय झाला आहे. (latest Marathi News)

लियो वराडकर हे सध्याचे सर्वांत तरूण आणि तृतियपंथी पंतप्रधान (Prime Minister) आहेत. लियो यांनी या निवडणूकीसाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी साल २०१५ मध्ये झालेल्या निवडणूकीतच आपण तृतियपंथी असल्याचे मान्य केले होते. आयर्लंडची निवडणूक (Election) ही सोपी तितकी नव्हती कारण या ठिकाणी तृतियपंथी व्यक्तींना गुन्हेगाराच्या चष्म्यातून पाहिले जाते. मात्र तरीही त्यांनी मोठ्या जिद्दीने विक्रम नोंदवला आहे.

देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय! ; सौरभ कृपाल बनले पहिले 'समलैंगिक जज'

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ११ नोव्हेंबर रोजी जेष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस न्यायमूर्ती पदी बढती करण्यासाठी केली होती. सुप्रिम कोर्टाने त्याला संमती देत कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायलयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती केली आली आहे. या निर्णयाचे ऐतिहासिक म्हणून स्वागत केले जात आहे. कारण SC कॉलेजियमने न्यायव्यवस्थेमध्ये उघडपणे गे सदस्याला न्यायाधीश करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सौरभ कृपाल हे पहिले गे न्यायमूर्ती झाले आहेत.

लिव्ह-इन किंवा समलैंगिक संबंध देखील कौटुंबिक : सुप्रीम कोर्ट

कायदा आणि समाज या दोन्हीमध्ये "कुटुंब" या संकल्पनेची प्रबळ समज अशी आहे की त्यात "आई आणि वडील आणि त्यांच्या मुलांसह एकल, न बदलणारी अस्तित्व असते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने रविवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, "ही कल्पना या दोन्हीकडे दुर्लक्ष करते, अनेक परिस्थिती ज्यामुळे एखाद्याच्या कौटुंबिक रचनेत बदल होऊ शकतो आणि अनेक कुटुंबे ही अपेक्षा पूर्ण करत नाहीत." सुसंगत नाहीत. कौटुंबिक संबंध घरगुती, अविवाहित भागीदारी किंवा विचित्र संबंधांचे रूप घेऊ शकतात, असंही यात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT