New Vande Bharat Sleeper Train News Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Sleeper : गुड न्यूज! १७ जुलैला सुरू होतेय नवी वंदे भारत स्लीपर; जाणून घ्या मार्ग, थांबे अन् तिकिटांचे दर

Vande Bharat Sleeper : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृतसर-वाराणसी वंदे भारत स्लीपर 'संत रविदास एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नव्या ट्रेनचा मार्ग, वेळापत्रक, प्रमुख थांबे, धावण्याचे दिवस आणि धार्मिक पर्यटनाला होणारा फायदा जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Amritsar to Varanasi Vande Bharat Sleeper route : रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलै रोजी देशातील दुसऱ्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. ही आलिशान ट्रेन पंजाबमधील अमृतसर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी दरम्यान धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनला 'संत रविदास एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले आहे. या नव्या स्लीपर ट्रेनमुळे आता प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी पद्धतीने करता येणार आहे. ही ट्रेन नेमकी कधी सुटणार, तिचा मार्ग कोणता असेल आणि ती कुठे-कुठे थांबणार? याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशातील दुसऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. संत रविदास एक्सप्रेस असे या टेनला नाव दिले आहे. ही वंदे भारत ट्रेन उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांना जोडणार आहे. या एक्सप्रेसमुळे वाराणसी आणि अमृतसर या दोन शहरांचा प्रवास अतिशय आरामदायी होणार आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील जालंधर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनचे उद्घाटन करतील. त्याच दिवशी, पंतप्रधान जालंधरमधील नव्याने बांधलेल्या प्रगत रेल्वे स्थानकाचाही उद्घाटन करणार आहेत. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या ट्रेनचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मार्ग आणि वेळापत्रक

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अमृतसर जवळील अमृतसर आणि वाराणसी या दरम्यान धावणार आहे. १४६२४ आणि १४६२३ असा ट्रेनचा क्रमांक आहे. ही ट्रेन आठवड्यातून सात दिवस धावण्याऐवजी फक्त तीन दिवस धावेल.

ट्रेन क्रमांक १४६२४ (अमृतसर ते वाराणसी)

प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी वंदे भारत स्लीपर ट्रेन अमृतसह येथून दुपारी ०२:०५ वाजता सुटणार आहे. ती ट्रेन वाराणसीमध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.

प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवार ही ट्रेन वाराणसीहून संध्याकाळी 07:05 वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी ०४:३५ वाजता अमृतसरमध्ये पोहोचेल.

कोणत्या स्थानकावर थांबणार ?

वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या व्यापारी आणि धार्मिक केंद्रांना जोडेल. मार्गावरील प्रमुख थांबे अमृतसर, जालंधर शहर, लुधियाना, अंबाला कॅन्ट, सहारनपूर, मोरादाबाद, बरेली, शाहजहानपूर, लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर शहर हे असतील. रेल्वेची प्राथमिक देखभाल पंजाबमधील छेहरटा स्थानकावर केली जाईल.

धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना

'संत रविदास एक्सप्रेस' सुरू झाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. पण त्याचबरोबर दोन्ही राज्यांमधील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. वाराणसी (काशी) आणि अमृतसर (सुवर्ण मंदिर) ही देशातील दोन महान आध्यात्मिक केंद्रे आहेत. त्याशिवाय, पंजाबमध्ये राहणाऱ्या संत रविदासजींच्या लाखो अनुयायांसाठी, त्यांच्या जन्मस्थानी, वाराणसीला (शीर गोवर्धनपूर) प्रवास करणे आता अधिक आरामदायक होणार आहे. यामुळे वेळेची बचत करणारे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केस सुंदर करण्याच्या नादात हेअर फॉल वाढतोय? 'या' ५ हेअर टूल्सचा वापर करताना घ्या काळजी

Sugar Detox: मध, गूळ, साखर काहीच नाही! 1 महिना गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद केलं तर शरीरात होतात हे 4 बदल

लाडक्या लेकीसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 सुंदर डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात भिंत फोडून सराफी पेढी लुटली, हडपसर मांजरीतील घटना

Ratnagiri News : कोकणात ATS ची मोठी कारवाई! 'पाकिस्तान कनेक्शन' उघड, ATS च्या धाडीत संशयित तरुण ताब्यात

SCROLL FOR NEXT