Vande Bharat Express, India Russia Dispute Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Express: 'वंदे भारत' रेल्वेवरून भारत आणि रशियामध्ये वाद? काय आहे कारण

India-Russia Relations: 'वंदे भारत' रेल्वेवरून भारत आणि रशियामध्ये वाद? काय आहे कारण

Satish Kengar

Vande Bharat Express News: भारत आणि रशियामध्ये वंदे भारत रेल्वेच्या उत्पादनाशी संबंधित संयुक्त उपक्रमातील हिश्यावरून वाद वाढला आहे. संयुक्त उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या भारतीय कंपनीला यामध्ये जास्त हिस्सा हवा आहे. मात्र रशियन कंपनी याच्या विरोधात आहे, ज्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरु झाला आहे.

भारत आणि रशियामधील कंपन्यांचा समावेश असलेल्या संयुक्त उपक्रमाने 120 नवीन वंदे भारत गाड्या तयार करण्यासाठी आणि पुढील 35 वर्षांसाठी त्यांची देखभाल करण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचा करार केला आहे.

रशियन कंपनी Metrowagonmash ही रशियातील सर्वात मोठी वाहतूक अभियांत्रिकी कंपनी Transmashholding भाग आहे. या रशियन कंपनीचे रेल्वेसाठी रोलिंग स्टॉक विकसित करणे, डिझाइन करणे आणि तयार करणे यात कौशल्य आहे. या कंपनीने भारतातील सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) सहकार्याने 120 वंदे भारत गाड्या तयार करण्याचे कंत्राट मिळवलं आहे. (Latest Marathi News)

न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, करार मिळवणाऱ्या संयुक्त उपक्रमात Metrowagonmash ची 80 टक्के आणि आरव्हीएनएलची (RVNL) 26 टक्के भागीदारी आहे. भारताची कंपनी आरव्हीएनएलला (RVNL) आता संयुक्त उपक्रमात 69 टक्के भागभांडवल मिळवायचे आहे. Metrowagonmash या रशियन कंपनीची हिस्सेदारी 26 टक्क्यांपर्यंत कमी करून तिसरा भागीदार लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टिम (एलईएस) 5 टक्के हिस्सा मिळवायचा आहे.

वंदे भारत ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे

सध्या भारतात 10 वंदे भारत रेल्वे धावत आहेत. हे रेल्वे भारतातील सर्वात वेगवान रेल्वे मनाली जाते. ज्याचा वेग ताशी 160 किलोमीटर आहे. या सेमी-हाय स्पीड रेल्वेमध्ये 16 सेल्फ-प्रोपेल्ड डब्यांचा समावेश आहे. भारताच्या या आधुनिक रेल्वेमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत.

यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर अशा अनेक सुविधा आहेत. भारत सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात 2024-25 च्या अखेरीस भारतात 400 वंदे भारत गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT