Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News : ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, पोलिसांनी केला दोघांचा एन्काउंटर, २४ तासाच्या आत ठोकल्या बेड्या

Uttar Pradesh 6 year Old Girl Raped Case : ६ वर्षांच्या मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ६ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

  • दोन आरोपींना पकडण्यात यश

  • आरोपींना पकडताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र आरोपींना बेड्या ठोकताना दोघांच्याही पायात गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर शस्त्रे आणि काडतुसे जप्त केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी संध्याकाळी सिकंदराबाद पोलिस स्टेशन परिसरातील मोहल्ला राजपुरा येथे पीडित मुलगी इमारतीच्या छतावर खेळत होती आणि नंतर ती इमारतीच्या मागच्या बाजूला नको त्या अवस्थेत आढळली. मुलीला ताबडतोब सीएचसी सिकंदराबाद येथे नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, राजू आणि वीरू कश्यप त्यांच्या इमारतीत भाडेकरू म्हणून राहतात. तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली.

या संदर्भात पीडित चिमुकलीच्या वडिलांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके तयार केली. पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी कानवारा रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या इद्रिश कहाटा या वसाहतीत लपले आहेत.

सिकंदराबाद पोलिसांनी गुन्हेगारांना इमारतीला घेराव घातला. गुन्हेगारांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलिस पथकावर गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात राजू आणि वीरू कश्यप यांच्या पायाला गोळी लागली आणि त्यांना जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT