देश विदेश

Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी नवा प्लान!, 4 दिवसात खूशखबर मिळण्याची शक्यता

Uttarkashi Tunnel Accident Update : शुक्रवारी ड्रिलिंग सुरू असताना ऑगर मशिनचा काही भाग अडकल्याने मशीन पूर्णपणे बिघडले. त्यानंतर आता दुसऱ्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे.

प्रविण वाकचौरे

Uttarkashi Tunnel Accident: 

उत्तरकाशीतील सिलक्यारा निर्माणधीन बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे गेल्या दोन आठवड्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र बचावकार्यात येणाऱ्या अडचणींमुळे प्रशासन अद्याप कामगारांपर्यंत पोहोचू शकलेलं नाही.

मोठ्या ड्रिलिंग मशीनद्वारे बोगदा खोदून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बचाव कर्मचाऱ्यांनी केला. मात्र शुक्रवारी ड्रिलिंग सुरू असताना ऑगर मशिनचा काही भाग अडकल्याने मशीन पूर्णपणे बिघडले. त्यानंतर आता दुसऱ्या पर्यायावर काम सुरू करण्यात आले आहे.

उभे खोदकाम सुरु

रविवारी बोगद्याच्या वरच्या भागावरून उभ्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे २० मीटर खोदकाम करण्यात आले आहे. व्हर्टिकल ड्रिलिंग हा पाच पर्यायांपैकी एक आहे ज्यावर काही दिवसांपूर्वी काम सुरू करण्यात आले होते.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण ८६ मीटर उभे ड्रिलिंग करण्यात येणार असून त्यासाठी चार दिवस लागतील. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत काहीतरी खूशखबर येईल, अशा आशा व्यक्त केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उभे खोदकाम जोरात सुरू आहे. कोणतीही अडचण आली नाही तर गुरुवारपर्यंत चार दिवसांत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ७०० मिमी पाईप्स ड्रिल केले जात आहेत आणि 'एस्केप पॅसेज' तयार करण्यासाठी ढिगाऱ्याच्या आत टाकले जात आहेत. यापासून काही अंतरावर ७० मीटरपर्यंत पातळ २०० मिमी व्यासाचे पाईप टाकले जात आहेत.

DRDOची टीम देखील दाखल

उत्तरकाशी बोगद्यात अंदाजे ६० मीटर परिसरात ढिगारा पसरला आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि मद्रास सॅपर्सचे इंजिनिअर्सचे पथकही सिलक्यारा येथे पोहोचले आहे. या टीम मॅन्युअर ड्रिलिंगमध्ये मदत करण्यासोबतच ऑगर मशीनला विविध पार्ट्समध्ये कापून वेगळं करत आहेत.

दुर्घटना कशी घडली?

१२ नोव्हेंबर रोजी सिलक्यारा ते बरकोटपर्यंतचा निर्माणाधीन बोगद्याचा ६० मीटर भाग कोसळला होता. यामध्ये काम करणारे ४१ कामगार यामुळे आतमध्ये अडकले आहेत. मजुरांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.. ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL आणि THDCL या पाच एजन्सींना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT