Uttarkashi tunnel collapse live video trapped 41 workers uttarakhand  Saam TV
देश विदेश

Uttarakhand Tunnel Accident: उत्तराखंडमध्ये बचावपथकाला मोठं यश; बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला VIDEO समोर

Uttarakhand Tunnel Accident: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुखरूप असून त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

Uttarakhand Tunnel Accident Video

उत्तराखंडमधील १२ नोव्हेंबर रोजी एक मोठी दुर्घटना घडली. उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्याचं काम सुरू असताना अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला. यामध्ये तब्बल ४१ मजूर अडकून पडले आहेत. या मजूरांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. दरम्यान, आज बचावकार्याचा दहावा दिवस असून बचावपथकाला मोठं यश मिळालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुखरूप असून त्यांचा पहिला व्हिडीओ समोर (Viral Video) आला आहे. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत पोहचण्यास बचावपथकाला मोठे यश मिळाले असून सर्व मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सर्व मजूर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत कॅमेरा पोहचल्यामुळे बचावकार्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय रेस्क्यू टीमने बोगद्यात ६ इंची पाईप टाकण्याचे काम वेगाने सुरू केले आहेत. या पाईपने आतापर्यंत ५७ मीटरचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती आहे.

पाईपच्या मदतीने मजुरांपर्यंत अन्न म्हणजे ब्रेड, भाजीपाला आणि वैद्यकीय वस्तू पाठवल्या जाणार आहे. याआधी बोगद्यात अडकलेले मजूर फक्त मुरमुरे, उकडलेले व भाजलेले हरभरे आणि सुका मेवा खात होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे.

सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी ५ दिवस ते एक आठवड्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. जसजसा बचाव कार्याला वेळ लागत आहे, तसतशी बोगद्यात अडकून पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांची चिंता वाढत आहेत. अनेक मजुरांचे कुटुंबीय सिल्क्यरा येथे पोहोचले आहेत. प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT