Uttarakhand Tunnel Accident: 7 Workers Dead in Chamoli Saam Tv
देश विदेश

Chamoli Tunnel Collapse : चमोली बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना! मातीचा ढिगारा अन् पाणी शिरलं, ७ कामगारांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Chamoli Tunnel Collapse Update : उत्तराखंडच्या चमोलीतील मायापूर-पिंपळकोटी येथे THDCच्या निर्माणाधीन बोगद्यात पाणी व मलबा शिरल्याने ७ कामगारांचा मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून अनेक कामगार जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना

  • चमोलीतील मायापूर-पिंपळकोटी येथे THDCच्या निर्माणाधीन बोगद्यात पाणी आणि मोठ्या प्रमाणात मलबा शिरला

  • २० कामगार बोगद्यात अडकले

  • ७ जणांचा मृत्यू १४ जणांना बाहेर काढण्यात यश

उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मायापूर पिंपळकोटी येथे अलकनंदा नदीवर THDC द्वारे बांधल्या जाणाऱ्या एका बोगद्यात अचानक मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने बोगद्यात २० कामगार अडकून पडले. या २० कामगारांपैकी ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला असून १४ जखमींना गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन मजूर अद्याप बेपत्ता आहेत. एसडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत.

प्रत्यक्षदर्शी आणि बचावलेल्या मजुरांच्या माहितीनुसार, टनेलमध्ये अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच वेगाने पाणी आत घुसले. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात मलबा कोसळल्याने मजुरांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. काही मजूर पाण्यात अडकले, तर काही जण मलब्याखाली सापडले. टनेलमधील लूज भाग अचानक खचला. त्यानंतर वरच्या भागात साचलेले पाणी टनेलमध्ये शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली. या दुर्घटनेत २० पैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून १४ जणांना बाहेर काढण्यात एसडीआरएफच्या टीमला यश आले आहे.

या दुर्घटनेत पंजाबमधील ४७ वर्षीय सबीर सिंह यांचा जबडा तुटला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच छत्तीसगडमधील २० वर्षीय सुनील दीवान यांनी या दुर्घटना कशी घडली? याबद्दल सांगितले की, एक मोठा आवाज झाला आणि काही कळायच्या आधीच क्षणांतच सर्व मजूर पाण्यात बुडू लागल्याचे सांगितले. तसेच झारखंडमधील काही मजुरांचे पाय मलब्यामध्ये अडकले आणि ते जखमी झाले.

विशेष म्हणजे, याच प्रकल्पाच्या टनेलमध्ये ३० डिसेंबर २०२५ रोजी दोन लोको ट्रेनची धडक झाली होती. त्यावेळी सुमारे ११० जण ट्रेनमध्ये होते आणि ८८ कामगार जखमी झाले होते. त्यामुळे या प्रकल्पातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

Ice Coffee Benefits : एक कप आईस कॉफी आरोग्यासाठी बेस्ट, जाणून घ्या 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT