UttaraKhand Bus Accident Saamtv
देश विदेश

Mussoorie Bus Accident: मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये प्रवासी बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२२ जण जखमी

UttaraKhand Bus Accident: मसुरी-डेहराडून रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे.

Gangappa Pujari

UttaraKhand Accident News: उत्तराखंड (Uttarakhand News) राज्यातून एक मोठ्या अपघाताची बातमी सध्या समोर येत आहे. उत्तराखंडच्या मसुरी-डेहराडून रस्त्यावर रविवारी दुपारी प्रवासी वाहतूक बस दरीत कोसळल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ हून अधिक लोक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस आणि आयटीबीपीच्या जवानांसह स्थानिक लोक जखमींना खड्ड्यातून बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत. तर १९ जखमींना डेहराडूनला पाठवण्यात आले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मसुरी डेहराडून हायवेवर शेर घाडीजवळ मसुरीच्या पाच किमी आधी हा बसचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत-बचावासाठी धावले आहे. बस मसुरीहून डेहराडूनला परतत असताना शेर घाडीजवळ 100 मीटर खोल दरीत कोसळली. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरातील बस अपघाताची ही दुसरी दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमधील सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस खड्ड्यात पडली होती. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

Maharashtra News Live Update: रायगडच्या माणगावमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा

मुंबई-पुणे मिसिंग लिंक ठरतोय गेमचेंजर; १० दिवसांत नेमकं काय चित्र बदललं? महत्वाची माहिती समोर

NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

Hypertension Symptoms: शरीरात दिसतायत ही ५ बदलती लक्षणं? वेळेत ओळखा वाढलेल्या ब्लड प्रेशरचा धोका

SCROLL FOR NEXT