Accident Saam tv
देश विदेश

Accident : काळाचा घाला! वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, लग्नघरी शोककळा

Wedding Car Crash in Kushinagar: उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे लग्नाच्या वऱ्हाडाची कार झाडाला धडकली. अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी. आनंदमय वातावरण एका क्षणात दुःखात बदलले.

Namdeo Kumbhar

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या कार झाडाला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. कार इतक्या वेगाने झाडाला धडकली की सर्व दरवाजे लॉक झाले. त्यामुळे कारमधील मृतदेह कारच्या बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला. लग्नाला जाणाऱ्या कारचा अपघात झाल्यामुळे लग्नघरी शोककळा परसली आहे. एका क्षणात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.

कुशीनगरमधील पडरौना-पनियहवा मार्गावर भुजौली शुक्ल गावाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. नेबुआ नौरंगिया येथील देवगांव येथे लग्न समारंभासाठी गेलेली एक भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. अपघात इतका भयानक होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला.

नारायणपूरमधून आठ जण कारमधून लग्नासाठी निघाले होते. कार अतिशय भरधाव वेगाने सुरू होती. भुजौली शुक्ल गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट झाडावर जाऊन आदळली. झाडाला इतकी जोरदार टक्कर दिली कारचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज परिसरात गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण कार चक्काचूर झाल्याने कोणालाही बाहेर काढणे शक्य झाले नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गॅस कटरच्या मदतीने गाडीमधील जखमींना आणि मृतांना बाहेर काढले. पोलिसांनी तात्काळ जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. गोरखपूर येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT