Uttar Pradesh Sultanpur News Saam Tv
देश विदेश

Shocking : "ती नसताना मी जगून काय फायदा?" प्रेयसीचा अपघातात मृत्यू, प्रियकराने ४८ तासांत संपवलं स्वतःच जीवन

Uttar Pradesh Sultanpur News : प्रेयसीच्या अपघाती मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • प्रेयसीच्या अपघाती मृत्यूनंतर तरुणाने आत्महत्या केली

  • आत्महत्येपूर्वी इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ पोस्ट

  • पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक करून मृतदेह शोधला

  • घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

प्रेमात चंद्र तारे तोडून आणण्याच्या आणाभाका दिल्या जातात. मात्र उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या अपघाती मृत्यूनंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळफास घेण्यापूर्वी तरुणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, यामध्ये तो म्हणाला, "ती जिवंत नसताना मी जगून काय फायदा?" ही घटना लंभुआ पोलिस स्टेशन परिसरातील भागीरथ पट्टी घाटमपूर उत्तर गावात घडली. या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव दिनेश उर्फ ​​विनीत असे आहे. तो गुरुवारपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांनी खूप शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर बेपत्ता व्यक्तीची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले आणि शुक्रवारी रात्री उशिरा गावाजवळील कालव्याच्या पलीकडे असलेल्या बागेत त्याचा मृतदेह सापडला.

दिनेशच्या भावाच्या म्हणण्यानुसार, दिनेशची गावाजवळील एका तरुणीसोबत सोशलमिडीयावर मैत्री झाली. या मैत्रीतून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलगी चांदा बाजारातील एका मार्केटमध्ये काम करत होती. २५ फेब्रुवारी रोजी ती तिच्या भावासोबत कामावर जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर एक कुत्रा आला. दुचाकी नियंत्रणाबाहेर गेली, ज्यामुळे मुलगी आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर दिनेशला खूप मोठा धक्का बसला. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येपूर्वी दिनेशने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले की, "ती जिवंत नसताना मी जगून काय फायदा?" दिनेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT